क्षीरसागर यांच्याशी एकदम सहमत. पण हा झाला सकारात्मक उपाय , जो आजपर्यंत माहित असूनही न अंगिकारलेला . नकारात्मक उपाय म्हणजे स्वैराचार, ज्यात सर्वांगिण किंमत द्यावी लागेल. (पाश्चात्य देशांमध्ये बोकाळलेला) सकारात्मक उपाय आपल्या हातात असतो, पण जसं दुर्जनः प्रथमं वंदे, तसं चांगल्या उपायांची जबरदस्ती न झाल्याने ते उपयोगात आणले जात नाहीत. तरीही पूर्वीपेक्षा सध्या परिस्थिती बरी आहे. पूर्वी एखाद्या जातीच्या पोटजातीतही रोटी बेटी व्यवहार होत नसत, ते निदान आता मुख्य जात पाहून तरी केले जातात. कालांतराने ही परिस्थिती नक्की बदलेल.