मग मनाचा चालक कोण आहे? ते अनिर्बंध झाल्यानं स्वयंचलित वाटतंय आणि त्याची
प्रक्रिया ऐच्छिक करणं हा त्यावर हुकुमत मिळवण्याचा मार्ग आहे.
माझ्या प्रतिसादात मनाचा काहीच उल्लेख नव्हता. संगणकशास्त्राची संकल्पना तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरल्याने त्याची खिल्ली उडवावीशी वाटली.
संगणकाचे काम कसे चालते हे दाखवणारी खालील आकृती पाहा. यात कुठेही प्रोग्रॅमरचा संबंध नाही. प्रोग्रॅम रन करण्यासाठी प्रोग्रॅमरची आवश्यकता नसते. (अन्यथा ऑटोमेशन वगैरे प्रकारच अस्तित्वात आले नसते).

या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा
पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
तुमची मनाची व्याख्या सांगितल्यास बरे होईल शिवाय हे 'जाणण्याचे' काम कोणता अवयव करणार आहे तेही सांगावे? हे मनाव्यतिरिक्त जाणण्याचे काम करणारी व्यवस्था जर मानवात असेल तर मनाचे काम काय आहे हे समजले तर आणखी चांगले. मानवी शरीरात ड्युअल कोअर वगैरे प्रकारचा सीपीयू आहे की काय? एक कोअर हा मन व दुसरा 'चालक'
बाय द वे, मनाचा 'चालक' असा कोणी असतो की काय ते मला माहिती नाही. पण असा कोणी चालक असल्यास तो चालकही अनिर्बंध होऊ शकतो व त्या चालकाचा चालक शोधून त्या चालकाच्या चालकाद्वारे चालकाचे नियंत्रण व पर्याचाने मनाचे नियंत्रण करावे लागेल.
आम्हाला एकंदरीतच या अशारीरिक भानगडी कमी कळत असल्याने अधिक खुलाशाची मागणी केली.