जेंव्हा मी "मन दुभंगते"  असा शब्दप्रयोग वापरतो त्याचा अर्थ ते एखाद्या काडीप्रमाणे दोन तुकडे होते असा होत नाहि... हा सामान्य वाक्प्रचार आहे.

"अर्थात, मनाच्या प्रक्रियेला जाणणारा, मनाशी तादात्म्य पावत नसल्यानं अशा अवस्थेत सापडू शकत नाही. ते सर्जन सारखं आहे, तो जोपर्यंत पेशंटमध्ये भावनिक दृष्ट्या गुंतत नाही तोपर्यंत त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही."   
-- हे उदाहरण पुरेसं नाहि. सर्जनला मन आहे म्हणून त्याला भावनीक गुंतवणूकीचं ऑप्शन आहे. मनाची प्रक्रिया जाणणारा जर मनापासनं वेगळा असेल तर त्याला भावनीक गुंतवणुकी चं ऑप्शनच नाहि. ते ऑप्शन फक्त मनाला आहे. 

"या परिस्थितीत मन अनिर्बंध न होता ऐच्छिक होणं हे जगणं सुखाचं होण्याचा एकमेव मार्ग आहे आणि अध्यात्माचा सारा प्रयास 'मनापलिकडे' जाण्याचा आहे."
-- इच्छा होणे हा मनाचा प्रभाग आहे. मनाव्यतिरिक्त इतर कोणी "ऐच्छीक" होऊ शकत नाहि. तसं असल्यास दुभंगलेल्या मनस्थितीचं ते उत्तम उदाहरण आहे. मनापलिकडे जाणे म्हणजे मनाला अव्हॉईड करणे नव्हे तर मन परिपक्व करणे आहे. आध्यात्माचा प्रयास मनाला सच्चीदानंदाचा अनुभव करून देणे आहे. जेणेकरून ते नित्यपरिवर्तनीय संसाराचे सुख-दुःख भोगत बसण्यापेक्षा नित्यानंदाच्या अनुभवात रमेल. मन नित्यानंदात रमणे म्हणजे मनापलिकडे जाणे नव्हे. ति मनाचीच एक अवस्था आहे.

"एकदा निराकार दिसला आणि शांतता ऐकू आली की आपण 'निराकार शांतता आहोत' हा बोध होणं क्रमप्राप्त आहे,  आणि त्याला सिद्धत्व म्हटलंय. "
-- हा बोध मनालाच होतो. जे नित्यानंद आहे त्याला आणखी काही बोध करून द्यायची आवश्यकता नाहि. सिद्धत्व ही मनाची अवस्था आहे.