खरेच आहे प्रजोत यांचे मत बरोबर आहे. जाती जातीतील मना मधील अंतर राजकारण्यामुळेच वाढले आहे. क्षीरसागर यांचे मत पण बरोबरच आहे . परंतु त्यापेक्षा राजकीय पक्ष सुद्धा लोकशाहीत असलेल्या पक्षाला सत्ता मिळण्या साठी जास्तीत जास्त जागांची गरज असते व त्यामुळे ते उमेदवार निवडताना त्याची निवडून येण्याची शक्यता विचारात घेतात. शिवाय आपल्याकडे प्रत्येक १८ वर्षानंतर ( सज्ञान) माणसाला मताचा अधिकार जसा दिला आहे तसा मतदाराला उमेदवार होता येते व जर तो निवडून आला तर आमदार/खासदार होउ शकतो. त्यामुळे सर्व पक्ष सुद्धा निवडून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी देतात व तो निवडून येण्यासाठी  आटापिटा करतात. यात जातीचे उच्चाटन न करता त्याना जातीमुळे मिळणारी मते दिसतात.व असे करून सत्ता मिळवतात.  यांमुळे जर प्रजोत यांनी म्हटल्याप्रमाणे जर सर्वांना समान न्याय दिला तर जातीयता बरीच कमी होईल. तसेच आरक्षण हे मुळात देताना दर १० वर्षांनी कमी करून ०% टक्के करायचे होते पण राजकीय पक्ष मतांमुळे करू शकत नाहीत.