आपल्या आधीच्या पिढीचाही असाच दृष्टीकोन होता (आहे).
लेख चांगला आहे, परंतु दोन्ही बाजुने विचार केलेला दिसत नाही. कालानुरुप बदल होतातच. आपण सुरपारंब्या किंवा आट्यापाट्या किंवा तत्सम खेळ खेळत नाही आणि क्रिकेट खेळतो म्हणून तक्रार होतीच की. जिमपेक्षा व्यायामशाळा, जिमनॅस्टिकपेक्षा मल्लखांब, किंवा महागड्या (? ) टेनिस, बॅटमिंटंपेक्षा खोखो, कबड्डी का खेळत नाही म्हणून तक्रार होतीच की.
बाकी आपण आपल्य पुढच्या पिढीला खरच चांगले आचार आणि विचार (ते शुभंकरोती वगैरे राहू द्या बाजुला) देतोय का की आपणच नियम तोडून "नियम पाळत नाही" अशी तक्रार करतो.
थोडा अधिक विचार करा. प्रत्येक पिढी चांगलीच आहे, तिला समजून घेता आलं पाहिजे.