१. टीसीवरून जात बाहेर काढणे. (किमान लहान वयात तरी जातीबद्दल भ्रम नको).
२. फीमाफीचे फॉर्म्स न भरणे {सरकारला सवलत द्यायचीच आहे तर त्यांच्याचकडे कागदपत्र आहेत की}.
३. आरक्षणाने खूप काही फरकाने (गुणवत्तेने) आजकाल प्रवेश मिळत नाही. बारकाईने बघितले तर थोड्याश्या फरकाने प्रवेश मिळतो. असो. आरक्षण मुलातून नष्टच करावे या मताचा मी आहे, पण त्यापूर्वी सर्वांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मिळायला हव्याच.
४. जरा अतीच - कायदेशीर कागदपत्रांवर केवळ नाव, व माता-पित्याचे नाव असावे {आडनाव वगळून टाकावे}.  म्हणजे बरेचदा आडनावावरून जातीचा जो बोध होतो {जो बरेचदा चुकीचाही असू शकतो}, तो कमी होईल.