>यात कुठेही प्रोग्रॅमरचा संबंध नाही.
= ओएस हा डिजाईन्ड प्रोग्रॅम इन्स्टॉल्ड असल्याशिवाय कंप्युटर चालत नाही त्यामुळे वास्तविकातला कंप्युटर जरी स्वयंचलित वाटला तरी तो प्रोग्रॅमरनं केलेल्या प्रोग्रॅम प्रमाणेच काम करतो.
मी स्मृतीच्या संदर्भात मनाची प्रक्रिया कळावी म्हणून मन हा 'बायो-कंप्युटर आहे' असं म्हटलंय तर तुम्ही लगेच इथे आकृती दाखवली!
> शिवाय हे 'जाणण्याचे' काम कोणता अवयव करणार आहे तेही सांगावे?
अवयव कशाला पाहिजे? आपण आहोत ना?
पुढे तर तुम्ही प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची आठवण आणून दिली आहे.
>त्या चालकाचा चालक शोधून त्या चालकाच्या चालकाद्वारे चालकाचे नियंत्रण व पर्याचाने मनाचे नियंत्रण करावे लागेल.
= आपण मनाचे जाणते आहोत आणि स्वेच्छेनं मनाला चालवणार आहोत; तोच तर या लेखमालेचा उद्देश आहे. पहिल्यापासनं नीट शांतपणे वाचलं असतं तर ते कळायला काही अडचण नव्हती.