शरीर, मन आणि 'आपण' ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असा विचार करून पाहावा.
शरीर आणि आपण वेगळे कसे आहो, हे लवकर लक्षात येते. मन आणि आपण वेगळे कसे ते लवकर लक्षात येत नाही.
'आपण आपल्या आवडीने एखादी गोष्ट करतो' असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा 'मन आपल्याला ते करायला सांगत असते असा विचार करून पाहावा. एखाद्या वेळी 'आपण आपल्याला हवे ते आपल्या मनात आणू शकतो' असाही विचार करून पाहावा. कधी कधी आपण आपल्या मनाच्या विरुद्ध वागतो (दुसऱ्याच्या सक्तीने नव्हे,
'आपण' स्वतः ठरवून) तेव्हा मन आणि आपण ह्यातले वेगळेपण लक्षात यायला मदत
होते, असे वाटते.