मनाची सर्वांना पटेल आणि समजेल अशी व्याख्या अद्याप या चर्चेत आली नसल्याने हा गोंधळ झाला आहे. मन हे नक्की काय आहे याची प्रत्येकाची समज वेगवेगळी असू शकते. माझा समज असा आहे की मेंदू आणि मन हे वेगवेगळे नसून मेंदू जे विचारांचे प्रोसेसिंग करतो त्या 'फंक्शन' ला आपण मन म्हणू शकतो.

आता जर 'आपण' आणि 'मन' या गोष्टी वेगवेगळ्या असतील तर या गोष्टी वेगवेगळ्या असल्याचा विचार करणारी मनाव्यतिरिक्त आणखी एक व्यवस्था 'आपणा'कडे आहे. या व्यवस्थेकडे विचार करण्यासोबतच, असा विचार करु शकणाऱ्या मनासारख्या दुसऱ्या व्यवस्थेवर नियंत्रण करु शकणारी विशेष क्षमता आहे असा त्याचा अर्थ होतो.

त्यामुळे 'आपण' ही अशी नक्की कोणती व्यवस्था आहे याचा खुलासा होणे आवश्यक आहे. किंवा मनाची जी प्रचलित व्याख्या मी धरून चाललो आहे त्याऐवजी ती कशी वेगळी आहे याचा उलगडा होणे आवश्यक आहे असे वाटते.


अवांतरः आत्मा वगैरे कल्पनांचा समावेश केल्याशिवाय शरीर आणि आपण असेही काही वेगळे द्वैत असावे असा विचार करता येईल असे वाटत नाही.