आमच्या गावात मोहर्रमचा (दुःखाचा) उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असे.  मोठमोठ्या समूहांमध्ये अंगावर चाकू, ब्लेड वगैरे मारुन घेत मातम चालत असे. अगदी रस्त्यांवर रक्ताचे ओघळ वाहत असत. तिथे डोले हाच शब्द मी ऐकला होता. ताबूत हा शब्द वर्तमानपत्रात वाचून माहीत झाला. मोहर्रमच्या काळात नगर जिल्ह्यातील एका गावातील नातेवाईकांकडे जाण्याचा प्रसंग आला होता. त्या गावात मुसलमान वस्ती बऱ्यापैकी असावी. मात्र तिथे बँड वगैरे लावून (गणपती स्टाईल) डोल्यांसमोर नाचत होते हे पाहून या उत्सवाचे दुःख व आनंद असे दोन्ही पैलू लक्षात आले. (विकीपीडिया येण्यापूर्वीचे दिवस)