प्रतिसाद नीट वाचता येण्यासाठी मध्ये घेतो.
>शरीर, मन आणि 'आपण' ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, असा विचार करून पाहावा.
= विचार वगैरे करायची गरज नाही. ती वस्तुस्थिती आहे
>शरीर आणि आपण वेगळे कसे आहो, हे लवकर लक्षात येते
= येस, कारण ती ग्रॉस गोष्ट आहे. आता लगेच उठा आणि डोळे बंद करून रूममध्ये फक्त एक मिनीट चालून पाहा. शरीर चालतंय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
>मन आणि आपण वेगळे कसे ते लवकर लक्षात येत नाही.
= त्यासाठी मनाच्या प्रक्रियेचं आकलन होणं आवश्यक आहे.
प्रतिसादातल्या उर्वरित भागाला उत्तर देण्यात अर्थ नाही कारण बॅक-ट्रॅक ही प्रक्रिया माझ्या अनुभवाचं सार आहे आणि ती मनाच्या एका मोठ्या प्रभागापासनं तुम्हाला मुक्त करेल. या पुढे मनाच्या इतर दालनात प्रवेश लेखमालेच्या पुढील भागात होईल.