>> सिद्धत्व ही मन पूर्णपणे काह्यात आल्याची अवस्था आहे.
-- मन कह्यात येणं हि सिद्धत्वाची सुरुवात आहे. मन नित्यांनंदात रमून जाणं हे पूर्ण सिद्धत्व आहे.

तुम्ही तुमच्या मुलाला असं ट्रेन केलं कि तो तुमचे इन्स्ट्र्क्श्न्स विनाविलंब, विना विचार केल्या ताबडतोब पाळातो. हि तुमच्या नातेसंबंधाची परिपूर्ती नाहि. वडिलांचे इन्स्ट्रक्श्न्स पाळणे हे आपल्याकरता हितकारक आहे, त्या मागे वडिलांची काही भुमीका आहे, त्यांचं प्रेम आहे, हे मुलाला उमगणं व म्हणून त्याने स्वतःहून तुमचे आदेश पाळायला तत्पर असणं,  हि नातेसंबंधांची परिपूर्ती आहे. (मी एक ऍनॉलॉजी दिली आले. मन "आपलं" अपत्य नाही हे मला ठाऊक आहे)

बाबा रणछोडदासच्या शब्दात सांगायचं तर मनाला कह्यात आणून त्याला विचारांच्या जंजाळात फसायला मज्जाव करून केवळ संवेदनेला रिस्पॉन्स द्यायला लावणं म्हणजे मनाला "वेल ट्रेन" करणं. मनाला नित्यानंदाची अनुभुती देऊन त्याला नित्यानंदाचा ध्यास लागणं म्हणजे मनाला "वेल एज्युकेट" करणं. मनाला ट्रेन करणं म्हणजे सिद्धत्व नाहि, तर मनाला एज्युकेट करणं म्हणजे सिद्धत्व.

मनाला सतत विचार करायची, त्यात सुख शोधायची सवय आहे. विचार त्याचं अन्न आहे. त्याला सतत संवेदनेवर स्थीर करणं म्हणजे सिद्धत्व नाहि. त्याला अमृताच्या कुरणात चरायला मोकळं सोडणं म्हणजे सिद्धत्व. या अमृताच्या कुरणात ते विनासायास संवेदनेवर स्थीर राहातं. निसर्गाने दिलेल्या संवेदनेला रिस्पॉन्स देणे व आपली नित्यानंदी स्थिती कायम ठेवणे हे जे "आपले" स्वरूप आहे ते ऍज इट इज मनात प्रतिबिंबीत होणे म्हणजे सिद्धत्व.

मन कह्यात आणून बोलणं संपत नाहि, तर तिथे ऍक्च्युअल संवादाला सुरुवात होते. असो.