"आमच्या वेळेला हे असे नव्हते" हा उद्गार प्रत्येक पिढीच काढते त्याला धरूनच हा लेख आहे. लेखकाला २६ वर्षातच फरक जाणवला तर मला ६२ वर्षातला फरक जाणवतो आणि तो मी" तेव्हां आणि आता" या लेखात व्यक्त केलाच आहे.  आजची पिढी आमच्या वेळेपेक्षा खूपच अधिक चटपटीत व  बहुशृत झाली आहे हेच खरे वास्तव आहे. "कौन बनेगा मराठी करोडपती "तल्या प्रश्नांची उत्तरे माझा नातू माझ्यापेक्षा चटकन देतो. तर माझा दुसरा नातू आताच वयाया सहाव्या वर्षी तबल्याचा पंधरा मिनिटांचा सोलो कार्यक्रम करतो. त्याला कदाचित तोंडी बेरीज वजाबाक्या करता येत नसतील पण त्याची आता काही आवश्यकता नाही. आता संगणक वापरता येणे महत्त्वाचे आहे तर आमची नातवंडे वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी संगणक प्रणाली तयार करतात.जे अजून मला तरी जमत नाही.आणि आता जमण्याची शक्यताही नाही. मोबाइल वापरताना अजून आमची फे फे उडते तर आमची नातवंडे एका मिनिटात एस. एम. एस. पाठवून मोकळी‌ होतात.संगणक चालत नसेल तर माझा नातू जेथे बसला असेल तेथूनच मला सांगतो, "आजोबा, असे करा म्हणजे चालू होईल"आणी तसे होतेही. . आमच्या लहानपणी आमच्या पाठ्यपुस्तकात एक नाट्यप्रवेश होता त्यात तीन पिढ्यांचे संवाद दाखवले आहेत व प्रत्येक पिढी नव्या पिढीस नावे कशी ठेवते ते वाचण्यासारखे आहे. तसेच आताही होत आहे.असो! हा विषय न संपणारा आहे म्हणून येथेच थांबतो.