शरीर चालतंय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
त्यासाठी मनाच्या प्रक्रियेचं आकलन होणं आवश्यक आहे.
शेवटचं विचारतो. आपल्याला कळतं म्हणजे ही कळण्याची क्षमता असलेला मनाव्यतिरिक्तचा अवयव कोणता?
उदा. आपण चालतो म्हणजे पाय चालतात. आपण खातो म्हणजे तोंड खातं. आपण पचन करतो. म्हणजे पोट पचन करतं. तसंच आपण विचार करतो म्हणजे शरीरातील विचार करण्याची क्षमता असलेली व्यवस्था (ज्याला रूढ अर्थाने मन म्हटले जाते) कार्यरत होते. मात्र तुमचा दावा मनाव्यतिरिक्त हा आपण जो काही आहे त्याबाबत आहे.
प्रतिसादातल्या उर्वरित भागाला उत्तर देण्यात अर्थ नाही
'आपण' आणि 'मन' या संकल्पना व त्यांचे द्वैत स्पष्ट करण्याची तुमची क्षमता दिसत नाही व तुम्ही तशी इच्छा नसल्याचा आव आणत आहात असे एकंदरीत प्रतिसादावरुन वाटत आहे. कदाचित या संकल्पनांमध्ये द्वैत नाहीच हे सिद्ध होऊन एकंदरीत लेखाचा फुगा फुटू नये म्हणून तुम्ही उत्तर देणे टाळत आहात असे मानावे लागत आहे.
असो या विषयावर गोलगोल न फिरता अर्थपूर्ण चर्चा होणार नसेल तर हा माझा शेवटचा प्रतिसाद.