माझे पोट, म्हणजे कुणाचे पोट?
माझे पाय, म्हणजे कुणाचे पाय?
माझे तोंड, म्हणजे कुणाचे तोंड?
...
...
माझे मन, म्हणजे कुणाचे मन?
...
...
असे प्रश्न विचारून पाहावे, असे सुचवावेसे वाटते. जे उत्तर असेल ते जाणवण्याचे, अनुभवण्याचे असेल. सिद्ध करण्याचे किंवा सिद्ध करता येण्याचे असेल असे नव्हे (असे मला वाटते). त्यामुळे तुम्हाला (जेव्हा/जर कधी) जे जाणवेल तेच मला तसेच जाणवलेले असेल असे सांगता येणार नाही, असे म्हणावेसे वाटते.
खरे म्हणजे, आपण आपल्या मनाहून निराळे कुणीतरी आहो, हे केव्हातरी 'कळून येते', हे माझ्या बाबतीत झालेले आहे (नुसते वरचे प्रश्न विचारून नव्हे!), मात्र तसे (कळून आल्याचे) 'सिद्ध' कसे करता येईल ह्याबद्दल शंका आहे.