आपण मनाहून निराळे आहोत याचे कारण मन हे आपल्यातच अंतर्भूत आहे. चालण्याचे काम करण्यासाठी दिलेले पाय, खाण्याचे काम करण्यासाठी दिलेले तोंड, रक्त हापसण्यासाठी दिलेले हृदय किंवा विचार करण्यासाठी दिलेला मेंदू (ज्याच्या विचार करण्याच्या व्यवस्थेला आपण मन असे म्हणतो) हे 'आपल्या' एकंदर व्यवस्थेचा भाग आहे. या सर्वांना एकत्र करुन 'आपण' अशी एक संकल्पना तयार होते.
आता हृदय हे 'आपल्या'पेक्षा वेगळे असले तरी रक्ताचे पंपिंग करण्यासाठी 'आपण' या विशिष्ट संकल्पनेला हृदयाची मदत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे मन हे 'आपल्या'पेक्षा वेगळे असले तरी विचार करणे वा तत्सम मानसिक क्रिया करण्यासाठी 'आपल्या'ला मनाचीच मदत घ्यावी लागते.
'आपण' या विशिष्ट संकल्पनेत विचार करण्यासाठी 'मन' वगळता इतर व्यवस्था आहे की काय हे हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जेव्हा 'आपण मनाचा विचार करतो' असे म्हणतो तेव्हा मनच मनाचा विचार करत असते. मनाच्या बाहेर येऊन मनाचा विचार करणे हा प्रकार त्यामुळे अशक्य आहे किंवा तो एक भ्रम आहे असे वाटते.
असो. यापुढे मतभिन्नतेवर एकमत आहे असे मानून थांबतो. कदाचित मला, मी व माझे मन या दोन्ही गोष्टीं विचार करण्याची क्षमता असलेल्या वेगळ्या गोष्टी असल्याची काही वर्षांनी आपोआप जाणीव होईलही. मात्र सध्यातरी तसे वाटत नाही.