यद वाचा अनभ्युदितं येन वागभुद्यते

तदेव ब्रह्म त्वं विद्धि

यन मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं

यत चक्षुषा न पश्यती  येन चक्षूंषी पश्यती   (कृपया संस्कृत शुद्धलेखनाकडे/व्याकरणाकडे दुर्लक्ष करावे - मतितार्थ पाहावा ही विनंती)

असे त्या जाणणाऱ्याचे वर्णन उपनिषदात केले आहे (केनोपनिषद)

जे वाणीने बोलता येत नाही, पण ज्याच्या योगाने वाणी बोलते., जे मनाने जाणले जात नाही पण ज्याच्या योगाने मन जाणते., जे डोळ्याने पाहता येत नाही पण ज्याच्यायोगाने डोळे पाहतात - त्याला संजयजी "आपण" म्हणताहेत.

एखादी गोष्ट मला कळते - हे ठीक आहे, पण मला कळत नाही - हे कोणाला कळले ? - तीच शुद्ध जाणीव . 

 देह, मनाच्या पलिकडे जे आपण आहोत ते हेच -  शुद्ध जाणीव. या जाणीवेपर्यंत पोहोचणे म्हणजेच परमार्थ. सर्व साधना याकरीताच सांगितल्या आहेत.

चर्चा उत्तम चालली आहे - अजून पुढे जाणून घ्यायला आवडेल. वादे वादे जायते तत्त्वबोधः - वाद -संवाद आवश्यक आहे - पण निर्मळ मनाने, व्यापक विचाराने - दुसऱ्याचेही म्हणणे समजून घेत - सत दर्शनाकडे सर्वांनी मिळून वाटचाल करुयात.