आई ओळखते की मेधा च्या आयुष्यात काहीतरी गडबड सुरु आहे. मेधा आईकडे सगळं बोलून मोकळी होते. आई तिची एक चांगली मैत्रीण बनून तिला छान मार्गदर्शन करते. त्यातून तिला आपल्या वागण्यातली चूक कळते. विक्रम तिच्यावर ज्या कारणास्तव प्रेम करतो, (म्हणजे त्याला ती का आवडते त्याचं मूळ कारण) त्या विषयावर मेधा आता लक्ष केंद्रित करू लागते आणि तिच्या प्रयत्नांमुळे तिला पूर्वीचा विक्रम परत मिळतो !
(विक्रम मध्येच चीड चीड करत होता. परत तो चांगला वागायला लागला. ते मात्र कथेतून अजून नीट स्पष्ट झालेलं वाटत नाही.)

मी फक्त सुचवलं . ह्यापेक्षा अनेक चांगले शेवट असू शकतात . चू.भू,द्या.घ्या.
धन्यवाद !