>>जे वाणीने बोलता येत नाही, पण ज्याच्या योगाने वाणी बोलते., जे मनाने जाणले जात नाही पण ज्याच्या योगाने मन जाणते., जे डोळ्याने पाहता येत नाही पण ज्याच्यायोगाने डोळे पाहतात
-- ते कधी बद्ध होत नाहि. त्याला कुणावर हुकुमत करायची गरज नाहि. त्याला मुक्तीची गरज नाहि. ते स्वभावतः मुक्त आहे. 

>>देह, मनाच्या पलिकडे जे आपण आहोत ते हेच -  शुद्ध जाणीव. या जाणीवेपर्यंत पोहोचणे म्हणजेच परमार्थ.
-- बरोबर. त्या जाणिवेपर्यंत पोहचायचय... पण कोणाला? ति जाणिव तर स्वतःच्या  ठिकाणी सदासर्वदा ऍज इट इज आहे. तिला आणखी कुठे पोहचवण्याची, शुद्धीची गरज नाहि. ति गरज मनाला आहे. जे काही धुलाईकार्य व्हायचय ते मनाचं.