लेखात मनाचा जो स्कोप दाखवण्यात आला आहे तो मला पटला नाहि.

>>पण ती आपण खुद्द आहोत हा उलगडा झालाय त्याला. 
-- हे आकलन मनाला होतं,  "आपल्याला" नाहि, असं मला वाटतं. "आपल्याला" नवीन काही आकलन होण्याचा संभव नाहि. तशी गरजही नाहि. "आपल्याला" मनाचं आकलन होत नाहि... मनाला त्याच्या सतत विचार करण्याच्या वृत्तीचं आकलन होतं. असं सतत भिरभिरत राहाणं काही फायद्याचं नाही हे मनाला पटतं. नित्य परिवर्तनीय जग म्हणजे उर्जेचे केवळ रूपांतरण आहे, त्यात सुख शोधायची धडपड व्यर्थ आहे हे मनाला कळतं. खरं सुख नित्यशाश्वत जीवंतपणाच्या अनुसंधानात आहे याचा बोध मनाला होतो. त्यातून शांतीची अनुभुती मनाला येते. "आपण" या सर्व कार्यकलापापासून नेहमी अनटच्ड राहतो.

माझ्या मते  लेखात ज्या ठिकाणी मन म्हटलय तिथे "मनाची रँडम विचार करण्याची वृत्ती" आणि जिथे "आपण" म्हटलय तिथे "मन" हे दोन रिप्लेसमेण्ट हवेत. असो.