आपली 'अमेरिकायणे' नेहमीच आवडतात. अमेरिकेतले भारतीय लोक आपापले डोळे आणि दात शक्यतो अमेरिकन डॉक्टरांच्या ताब्यात देत नाहीत. जुन्या काळी नवीन सुनेचा नाकातला आणि कानातला दागिना माहेरचाच असे. नाक आणि कान सासरच्यांच्या हातात जाऊ नयेत असे म्हणत असत. कोणी दागिना काढण्या घालण्याच्या निमित्ताने नाक-कान पिरगाळू नयेत हा हेतू.
आताच्या जमान्यात नाक-कानाच्या ऐवजी खिसा पिळून घेतला जाऊ नये इतकाच हेतूमधला फरक .