माझ्या मते लेखात ज्या ठिकाणी "मन" म्हटलंय तिथे मनाची रँडम विचार करण्याची वृत्ती " आणि जिथे "आपण" म्हटलंय तिथे "मन" हे दोन रिप्लेसमेण्ट हवेत. असो. >>>>
मन म्हणजे माईंडिंग - रँडम विचार करण्याची वृत्ती - हे तुम्ही बरोबर म्हणताय. पण "आपण" म्हणजे मन नाही - कारण शुद्ध जाणीव ही मनाच्या सदैव पलिकडेच आहे (मनाच्या आकलनापलिकडे आहे).
उदाहरणादाखल - आपल्याला साधा आवाज कळतो (ऐकू येतो) पण अल्ट्रासाऊण्ड नाही ऐकू येत - का तर, ती क्षमताच आपल्याकडे नाहीये - तसेच "शुद्ध जाणीवेला" मनाने जाणून घेता येत नाही, मनाच्याक्षमतेपलिकडील ती गोष्ट आहे .
समर्थ म्हणतात - अस्थिच्या देही मांसाचा गोळा । पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा । तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥
देह - मन -बुद्धी हे सगळे एकात एक गुंतलेले आहेत - त्यापलिकडे जायचा अवकाश की ती शुद्ध जाणीव आपली आपणच प्रकटेल. -स्वसंवेद्य, स्वयंप्रकाशी असल्याने. पण हे देह -मनाच्या - बुद्धीच्या पलिकडे विचाराने जाता येणे शक्यच नाही - कारण विचार म्हणजेच माईंडिंग - मनातीत होणेच गरजेचे आहे.