>> कारण शुद्ध जाणीव ही मनाच्या सदैव पलिकडेच आहे (मनाच्या आकलनापलिकडे आहे).
-> राईट. म्हणुनच मी म्हटलं कि विचारी आणि निर्वीचारी या दोन्ही मनाच्या अवस्था आहेत व त्यांचं आकलन मनालाच होतं.
>>तसेच "शुद्ध जाणीवेला" मनाने जाणून घेता येत नाही, मनाच्याक्षमतेपलिकडील ती गोष्ट आहे .
-> शुद्ध जाणिवेला कशानेच जाणून घेता येत नाहि... मनाने शुद्ध जाणिवेला जाणणं म्हणजे मनाने आपला रोख नित्यपरिवर्तनीय रूपांतराकडून नित्यशाश्वतेकडे वळवणं. "आपले मरण पाहिले म्या डोळा" असं तुकाराम म्हणतात त्याचा अर्थ मनाचे हेच ट्रांझीशन आहे.
>>देह - मन -बुद्धी हे सगळे एकात एक गुंतलेले आहेत - त्यापलिकडे जायचा अवकाश की ती शुद्ध जाणीव आपली आपणच प्रकटेल.
-> होय. आणि या प्रकटीकरणाचे आनंदतरंग मनातच उमटतात. हे जे "पलिकडे" जाणे आहे ते म्हणजे मनाने अशाश्वताचा पसारा सोडून शाश्वततेकडे वळणे आहे. तसं नसतं तर समर्थ "मना सज्जना... " म्हणत मनाला समजवायच्या मागे लागलेच नसते. त्याच कारणाने ज्ञानेश्वर "सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा" म्हणत मनाला पांडुरंगाच्या अनुसंधानी लावायला जातात.