लव्ह ऍट फर्स्ट साईट ही एकमेव खरी गोष्ट  आहे! फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असायला हवं. एखादी व्यक्ती आपल्याला समग्रतेनं आवडणं म्हणजे 'लव्ह ऍट फर्स्ट साईट'.  नंतर तुम्ही  आपल्या आवडीचा (खरं तर आवडलेल्या व्यक्तीचा) ऍनॅलिसिस  करत नाही. तुम्ही एकमेकांशी सहज समन्वय साधता. ते आकर्षण फिटू म्हणता फिटत नाही . कितीही आणि कुठेही ऍडजस्ट केलं तरी ऍडजस्ट केलंय असं वाटत  नाही आणि तसं काही केल्याचं स्मरत देखील नाही.