आणि अशी अनेक उदाहरणे मी बघितली आहेत, ऐकली आहेत - बघतो आहे. त्या जोडप्यांसाठी सुद्धा हे नातं 'रम्य'च म्हणावं का ?
लव्ह आणि अरेंज अश्या दोन्ही प्रकारात.. लोकं पुरती फसलीयेत.. त्याबद्दल काय स्पष्टीकरण आहे माहित नाही.. लोक लग्नाच्या नावाखाली इतक्या ऍडजस्टमेंट करताना बघतोय.. "आयडियल" संकल्पना तर कुठच्या कुठे राहिल्या !
असो ..
माझ्या मते लग्न करण्यासाठी मनात लग्न करायची इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे. जर झालीच, तर अतिशय काळजीपूर्वक वर/वधू संशोधन करावे. (ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याचा स्वभाव कसा जाणून घ्यायचा इतक्या कमी कालावधी मध्ये ? -> माहित नाही ! / आपल्या व्यवस्थेकडे उत्तर नाही )
प्रेम प्रकरण असेल तर प्रत्येक विचार आणि कृती करताना 'आपण लग्न करणार आहोत' हा विचार मनात ठेवावा. म्हणजे लग्नाआधी केलेली एखादी गोष्ट लग्नानंतर कशी असू शकेल त्याचा अंदाज लावणे सोपे जाईल आणि वेळीच योग्य निर्णय घेता येईल. (प्रेम विवाह सुद्धा अतिशय जोरदार आपटलेले बऱ्याचदा आढळतात ! )
ह्या विषयात अगदीच निराशा नाहीये, पण शेवटी जिथे एखादी गोष्ट आपण नशिबावर सोडतो, तो माझ्या मते जुगार च !