सौंदर्यानुभूती - प्रेमोद्भव - सहवास ह्या तिन्ही गोष्टी परस्परसन्निध आणि परस्परकारक/पूरक आहेत असे वाटते.

सौंदर्यानुभूतीमुळे प्रेमोद्भव की प्रेमोद्भवामुळे सौंदर्यानुभूती ?
प्रेमोद्भवामुळे सहवास की सहवासामुळे प्रेमोद्भव ?
सहवासामुळे सौंदर्यानुभूती की सौंदर्यानुभूतीमुळे सहवास ?

ह्या सर्व मुद्द्यांवर आपल्या अनुभवांवर आणि सभोवताली घडलेल्या दिसणाऱ्या घटनांवर आधारित विचार करून पाहावा. अनेकानेक वर्षे ह्या मुद्द्यांवर समाजात निरनिराळ्या संदर्भात विचारांची देवाणघेवाण चालल्याचे दिसेल.