दोनच गोष्टी आहेत : एक, व्यक्ती प्रथमदर्शनी आवडणं आणि दोन, ओळख झाल्यावर तिच्याबरोबर वेळ मजेत जाणं, तिची कंपनी  आवडणं (शारीरिक संबंधाची गरज नाही).

तुम्हाला वाटेल प्रत्येक गोष्टीत अध्यात्म आणतोय पण साधी गोष्ट आहे. जिच्या सहवासात मजा येते तिचा सहवास हवाहवासा वाटतो पण जाणवत नाही. या उलट जिच्याशी पटणार नाही तिचं शारीरिक आकर्षण वाटेल पण सहवास विषेश भावणार नाही. कारण काय तर अस्तित्व एक आहे, इथे तुम्हीच आहात, 'दुसरा' असा  कुणी नाही. दुसरा जाणवतोय म्हणजे तो (किंवा ती) सतत तुमचं लक्ष वेधून घेतायंत. आणि नेमकं हेच वैवाहिक अपयशाचं कारण आहे.

तुम्ही  इथे यासंबधात प्रकाशित झालेले माझे लेख वाचा, उपयोगी होतील.