कोणत्याही स्तोत्राच्या शेवटी,
"इति श्री अमुकविरचितम् अमुकस्तोत्रम् संपूर्णम्" असं असतं.
यात, सुरुवातीला "इती" असल्यानंतर शेवटी पुन्हा "संपूर्णम्" असं म्हणण्याची आवश्यकता आहे का?
ते व्याकरणदृष्ट्या किंवा भाषेच्या दृष्टीने योग्य आहे का?
कारण, मला आतापर्यंत,
"अथ अमुकस्तोत्रम् प्रारंभम्/आरंभम्" असं कुठंही आढळलं नाही. मग
"इति श्री अमुकविरचितम् अमुकस्तोत्रम् संपूर्णम्" असं का लिहीतात?
कृपया, मनोगतवरील जाणकारांनी माहिती द्यावी.
----कृष्णकुमार द. जोशी