कथेला बालकथा विभागात टाकताना मनात विचार आला कथा बाळबोध वळणाची असली तरी कुठेतरी आत आपल्या सर्वांना हलवून टाकते.
मला ह्या कथेतील अनेक बाबी आवडल्या १) आईचा पण वाढदिवस असू शकतो हे त्या छोट्याशा मुलीला जाणवणे. २) त्या वयातही आईच्या मधुमेहाची जाणीव असणे ३) लहान वयात आपले सर्व जमा पैसे दुसऱ्याच्या आनंदासाठी वापरणे. ४) त्या दुकानदाराने इतकी शुल्लक रक्कम घेऊन आलेल्या मुलीला न कंटाळता अनेक वस्तु दाखवणे. ५) त्या मुलीला आपली आई एखाद्या नटीप्रमाणे सुंदर वाटणे. ६) तिच्यासाठी अनमोल असलेले ते चाप काळजीपूर्वक एका रंगीत कागदात गुंडाळून त्याला वाढदिवसाची भेटवस्तु बनवणे. ७) ती गुंडाळी हातात आल्यावर आईच्या झालेल्या वेगवेगळ्या भावावस्था ८) आईचे एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणून आपला आनंद प्रकट करणे. ९) बाबांकडून घेतली जाणारी दखल १०) त्या लहान मुलीच्या घरकाम करण्याचा सहजगत्या झालेला उल्लेख इ.इ.
(केसाचे चाप ह्या शीर्षकाचे केसांचे चाप हा योग्य तो बदल केल्याबद्दल प्रकाशकांचे आभार).