२ नोव्हेंबर १९४५ ला श्री. रॉय यांच्याशी संवाद साधताना रमण महर्षींनी मनाबद्दल एक मार्मिक टिप्पणी केलेली आहे -
मनोनाश घडवून आण असे मनाला सांगणे हे चोराला पोलिस करण्यासारखे आहे. हा पोलिस तुमच्या समवेत येईल आणि चोराला पकडण्याचा बनावही रचेल, पण यातून काहीच फायदा (पारमार्थिक लाभ) होणार नाही.