इथे श्री. पुरंदरे यांनी ज्ञानेशांच्या दोन ओळी दिलेल्या आहेत -

जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरुप पटु फाटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ।।

तैसे मन येथ मुद्दल जाये । मग अहंभावादिक के आहे । म्हणौनी शरीरेची ब्रह्म होये । अनुभवी तो ॥

मनोनाश हा शब्द "तैसे मन येथ मुद्दल जाये" किंवा 'तो मनोरूप पटू फाटे" अशा अर्थाने घ्यावा असे सुचवतो.  रमण महर्षींविषयीच्या साहित्याच्या आजमितीला उपलब्ध असलेल्या मराठी अनुवादांमधे तो त्याच अर्थाने येतो.  'ब्रेन नॉट फंक्शनींग' असा नाही.  रमण महर्षी सिनेमाच्या प्रोजेक्टरचे 'जेथ हे संसारचित्र उमटे' शी साधर्म्य असलेले उदाहरणही देत असत.  असो.