अभिव्यक्ती आणि आकलन यात कमालीची तफावत आहे मग ते कुणी का म्हटलं असेना.
मनाचा पडदा वगैरे फाटणे असं काही होत नाही.
मनाचा प्रोजेक्टर बंद झाल्यानं समोरचा निराकार (ज्याचा उपयोग मन पडद्यासारखा करत होतं ) स्पष्ट दिसू लागतो. आता सिनेमात देखील प्रोजेक्टर बंद झाला याचा पडदा फाटण्याशी काहीएक संबंध नसतो.
आणि त्याचा अर्थ मनात (किंवा प्रोजेक्टरमध्ये) बिघाड झाला असा ही नसतो. मनाचं ऐच्छिक होणं म्हणजे हवा तेव्हा प्रोजेक्टर चालू करता येणं आणि गरज नसेल तेव्हा तो बंद असणं. बाय डिफॉल्ट तो बंद असायला हवा. पण आपला प्रोजेक्टर अनियंत्रित झाला आहे. तो सतत चालूच असतो. सदर लेखमाला त्या प्रोजेक्टरला कह्यात आणण्याविषयी आहे.
तस्मात तुमचे स्पष्टीकरण रद्द धरण्यात येत आहे.