"...भेटवस्तू घेऊ इच्छिते ..."
"...नंतर तिने माझ्या गालांचा पापा घेतला आणि माझे आभार पण मानले...."
"...दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्यासाठी घरचे सारे लोक एकत्र जमले..."
हि वाक्य तुमची तुम्हिच वाचून पहा. पहिलं किती कृत्रिम आहे, आणि देशी आई मुलीचे आभार मानते? अगदी हल्लीची धरली तरी? कधीपासून बुवा? 'नाश्त्यासाठी' जमले?
तुम्हाला जर हि गोष्ट देशी बनवायची असेल तर निव्वळ त्यात 'भिंर्गाडेकाका' आणि 'कोंकण' आणून नाही पुरणार. प्रयत्न छान आहे. अजून जरूर अनुवाद करा. पण बाकी प्रतिक्रियांवरून 'हे झक्क जमलंय' असं वाटून तुम्ही याच पातळीवर राहू नये असं वाटलं. तसं होउ नये या प्रामाणिक ईच्छेपोटि हे लिहिलं आहे एव्हढंच.