केवढा कल्लोळ आहे हा स्मृतींचा!
मन नव्हे, हा मासळी बाजार आहे!!
इथे मनात स्मृतींचा कल्लोळ आहे असे उला मिसऱ्यात म्हटले आहे! त्यामुळे होणारा कलकलाट अधोरेखित करण्यासाठी मासळीबाजार शब्द हा संयुक्तिक  आहे! स्मृती या गतकाळाच्याच असतात हे उघड आहे! जुनाबाजार म्हटल्याने कलकलाटाची शेड येत नाही!