देकार्तनं हीच चूक केली होती आणि एका प्रदीर्घ कालावधीवर त्याचा (चुकीचा) प्रभाव होता.
त्याचा दावा होता : 'आय थिंक देअरफोर आय एम' याचा अर्थ शांतता असते तेव्हा आपण नसतो! आणि वस्तुस्थिती नेमकी विपरित आहे, आपण मुळात शांतताच आहोत. मन भाषेमुळे तयार होतं, तरी भाषेपूर्वी आपण असतोच, नाही तर भाषा कोण शिकणार?
पुढे तुम्ही तीच चूक वाढवत नेलीये :
>त्याला मनाबाहेर काढुन, त्याच्यावर स्वतंत्र ऐच्छीकतेचं लिंपण करून
त्याच्याकरवी मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न करणं म्हणजे आपण आपल्याच
खांद्यावर बसायचा प्रयत्न करणं आहे.
= आपल्याला मनाबाहेर पडण्याची आवश्यकताच नाही. मन शरीरात आहे आणि आपण मनोशरीराचे जाणते आहोत.
>आणि तसा प्रयत्न यशस्वी झाला म्हणणं म्हणजे मनाची फसवणूक आहे.
= फार मोठी चूक आहे. मनाचं वर्चस्व मान्य करणं आणि स्वतःला 'मनाचाच भाव' समजणं म्हणजे स्वतःला निव्वळ कल्पना समजणं आहे. आणि ती स्वतःची फसवणूक आहे.
खरं तर ते स्वतःच संपूर्ण विस्मरण होणं आहे आणि तो अहंकार (मी -आकार) या कल्पनेचा एकमेव आधार आहे.