>>ते सगळं जाऊ  द्या. 
-> का बरं जाऊ द्या? हा लेख आणि या सर्व प्रतिक्रिया या तुमच्या मनाने लिहील्या आहेत कि नाही हा माझा सिंपल प्रश्न आहे. तो तुम्ही का टाळताय? त्या प्रश्नाच्या उत्तररातच तुम्हाला कळून येईल कि हा लेख लिहीण्याची इच्छा करणारं   व प्रतिक्रिया देण्याची इच्छा करणारं इतर कुणी नसून तुमचं मन आहे. दुसरं कुणी इच्छाधारी नाहि.

>>किंवा तुम्ही  ही जी काय आयडिया लढवली आहे :
--> मी आयडीया लढवली आहे? मी इथे वकिली पद्धतीने शब्दफेक करून डीबेट जिंकायला आलेलो नाहि. मी माझे कन्सेप्ट लॉजीकली मांडतोय. तुमच्या कडून लॉजीकल उत्तरांची अपेक्षा करतो. आयडीया लढवून गॉपीप्स करायचा अजीबात इंटरेस्ट नाहि. 

>>'तुम्ही नाही' हे तुम्ही सिद्ध करून दाखवा! 
>>त्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात हे सिद्ध करा.
--> इच्छा करणारं एक मन आणि वेगळ्याच इच्छा करणारं दुसरच  काहितरी अशा दोन एण्टीटी  नाहित. इच्छेचेउगम, प्रयोग आणि विसर्जन हे एका मनातच होतात, हे जेंव्हा तुम्हाला कळेल तेंव्हा इतर काही सिद्ध करण्याची आवश्यकताभासणार नाहि.
फॉर दॅट मॅटर, ज्या अर्थी तुम्ही मला काही सिद्ध करायला सांगताय त्या अर्थी तुम्ही आणि मी वेगळे आहोत व हे सर्व कम्युनिकेशनआपल्या मनांमध्ये चाललय हे सिद्ध होत नाही काय ?