मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपण म्हणता ते खरेच आहे. अनेक उल्लेख लिहिताना मलाही खटकले. पण जर पूर्ण भारतीय बाजाची कथा लिहायची तर ते भाषांतर ह्या सदरात मोडेल का?

अनुवादकाने रूपांतरण करताना करताना किती स्वातंत्र्य घ्यावे ह्याची मर्यादा ठरवणे कठीण आहे.

मूळामध्ये वाढदिवस साजरे करणे ही भारतीय संकल्पना नाही (माझ्या लहानपणी वाढदिवसाला केवळ औक्षण करीत असते. झालेच तर एखादा पेढा हातावर ठेवत). आजही मोठ्यांचा वाढदिवस अगदी शहरातही फारसा साजरा होताना दिसत नाही. आईचा वाढदिवस ही तर लांबची गोष्ट झाली. 

असे असताना ह्या कथेचे भारतीयीकरण करणे हे आह्नानात्मक खरेच.

असो. जमले तर ही कथा पुन्हा लिहून काढेन. पाहायचे मॅकबर्गरची मॅकआलु-टिक्की होते का ते.