>ज्या
अर्थी तुम्ही मला काही सिद्ध करायला सांगताय त्या अर्थी तुम्ही आणि मी
वेगळे आहोत व हे सर्व कम्युनिकेशनआपल्या मनांमध्ये चाललय हे सिद्ध होत नाही
काय ?
= संवाद मनाच्याच लेवलवर होतो. पण मनाचा जाणता तुमचा, माझा आणि सर्वांचा एकच आहे.
>ऐच्छीकतेचा सर्व मक्ता मनाकडे आहे, मनाला "ऐच्छीक" कंट्रोल करण्याची गरज आणि शक्यता इतर कुठे नाहित हे मान्य झालं तरी पुरे.
= तुम्हाला वाटतंय मन ही स्वयंचलित प्रणाली आहे आणि तिचा कुणीही करविता नाही (किंवा मनाचा एक भागच दुसऱ्या भागाचं नियंत्रण करतो) तस्मात ' ऐच्छीकतेचा सर्व मक्ता मनाकडे आहे ' (थोडक्यात ऐच्छीकता अशी काही नाही). हे मी 'डोळ्यांनी डोळे बघतो' असा व्यर्थ वाद घालण्यासारखं आहे. जोपर्यंत 'पाहणारा' नाही तोपर्यंत डोळ्यांनि काहीही दिसणार नाही.
माझा दावा असा आहे की आपण मनावेगळे आहोत आणि मनावर नियंत्रण मिळवू शकतो. माझ्या सर्व लेखनाचा समस्वर तोच असेल. तुम्ही जोपर्यंत मनंच सर्व आहे ही धारणा सोडत नाही तोपर्यंत या लेखमालेचा तुम्हाला उपयोग नाही. यापुढे याविषयावर चर्चा होणार नाही.