खटकलेलं सांगायचं तर असतं पण त्यामुळे लेखक नाउमेद तर नाही ना होणार अशी धास्तीही वाटत असते प्रतिक्रियाकाराला. त्यामुळे तुमचं उत्तर वाचल्यावर हुश्श झालं!

"अनुवादकाने रूपांतरण करताना करताना किती स्वातंत्र्य घ्यावे ह्याची मर्यादा ठरवणे कठीण आहे. " अगदी बरोबर आहे. मुळात, निगरगट्टपणे साहित्य ढापण्याच्या या जमान्यात, रुपांतरण करताना - तेही मूळ लिखाणाचा स्वच्छ उल्लेख केलेला असताना - किती स्वातंत्र्य घ्यावं, असा जबाबदारीपूर्वक विचार करणारे तुमच्यासारखे लोकं आहेत हेच अतिशय सुखद आहे. पण मला वाटतं कि तुम्ही लिखाणाच्या शेवटी मूळ कथेचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे फार फार तर वाचकाला 'हे वेगळंच आहे' वाटेल एव्हढंच.

तुमचेच (चपखल) शब्द वापरायचे तर अनुवाद करताना मॅकबर्गरच ठेवावा मॅकआलू-टिक्की करू नये. आणि भावानुवाद करायचा असेल तर मात्र कथेचा गाभा डोळ्यांसमोर ठेउन (एका मुलीने लहान वयात तिच्या आईवरच्या प्रेमापोटी  काहितरी केलंन, त्या कुटुंबात नंतर तशी पद्धतच पडून गेली पण आईला  त्या पहिल्यांदा मिळालेल्या भेटिचं/घडलेल्या प्रसंगाचं अतिशय अप्रूप होतं ) देशी आलू-टिक्की रांधावी; मॅकआलु-टिक्की नव्हे! या गोष्टिचं देशीकरण करताना वाढदिवस या ऐवजी काहितरी दुसरं निमित्त लागेल - कारण तुम्ही वर लिहिलं आहेच. कुठलं निमित्त? वेल, ते डोक्यात राहणं, दोन-चार कल्पना येऊन बाजूला सारणं, अस्वस्थ होणं आणि बसची वाट बघताना/लिफ्टमधे उभं असताना/चहा पित गॅलरीत उभं असताना नेमका आराखडा डोळ्यांसमोर येणं हि तर या सगळ्यातली मुख्य मज्जा!!

परत एकदा सांगतो - अशा छानशा कथा मराठी वाचकांसमोर आणण्याचा तुमचा प्रयोग/उद्योग चालू ठेवा. पुढिल लेखनाची प्रतीक्षा करतोय...