जमले तर ही कथा पुन्हा लिहून काढेन.
सुधारणेस असलेला वाव हेरून त्या दिशेने पुनःपुन्हा प्रयत्न करण्याचा तुमचा हा संकल्प प्रामाणिक आणि आश्वासक वाटतो. त्या अनुषंगाने पूर्वी मनोगतावरच कधीतरी लिहिलेले काही मुद्दे आठवले.
भाषांतरे करण्याचा माझा जो काही मर्यादित अनुभव आहे त्यावरून मला काही उपाय मिळालेले आहेत ते असे :
- सगळे भाषांतर एका बैठकीत करून ते त्वरित प्रकाशित करण्याची घाई करू नये.
- मूळ साहित्याच्या तंतोतंत मराठी भाषांतराचे टाचण काढून ते खणात ठेवून द्यावे. हे करताना कोठलाही तपशील मागे ठेवू नये. मूळ साहित्य ग्रंथालयास परत करावे किंवा उंचावर फळीवर ठेवून द्यावे.
- हे झाले की मध्ये काही दिवस दुसरे काहीतरी लिहावयास घ्यावे आणि वरील भाषांतर विसरून जावे.
- काही काळाने खणातील वरील टाचण उघडावे आणि त्याचे पुन्हा वाहत्या मराठीत भाषांतर/रूपांतर (जे काय करायचे ते) करावे. हे करताना मूळ साहित्य वाचू नये.
- एक दोनदा असे केले की टाचणातील नेमके काय आपण वगळतो आणि ठेवतो ते अंगवळणी पडते आणि नंतरच्या वेळी भाषांतर करताना टाचण काढतेवेळीच अंतिम भाषांतर तयार होऊ लागते.
हे करून पाहावे.
धन्यवाद.