हा सगळ्यांमधला जो 'मी' भाव आहे, तो उपाधीरहित आणि नित्यसिद्ध आहे. बंधन या 'मी' ला जाणवत नाही, त्यामुळे त्याने मुक्तीची आस धरणे संभवत नाही. तो संकल्प आणि विकल्पाच्या पलीकडे असल्याने त्याने मनाच्या प्रोजेक्टरला चालूबंद करण्याचा मनोव्यापार रचणेही अशक्य आहे. हा स्थल कालातीत 'मी' भाव आणि जडतत्वांनी बनलेले शरीर यांच्या मध्ये मन, बुद्धी वगैरेचा जो परिसर आहे तिथे संकल्प, विकल्प, बंधने, मुक्ती वगैरेचा खेळ चालतो. त्यामुळे या 'मी' ने निर्णय घेतला अशी कुणाचीही कितीही प्रगाढ धारणा असेल तर तो भ्रम आहे याबद्दल मी साळसूद यांच्याशी सहमत आहे.  असो.