काही वर्षांपूर्वी "मध्यम मध्यम" ही मालिका दूरदर्शनवर दाखविली जायची.
"सप्त सुरातिल आम्ही, ग म प ग म प आहोत मध्यम मध्यम
मध्यम मध्यम....... मध्यम मध्यम", असं काहीतरी तिचं शीर्षकगीत होतं.
त्यात मला जेवढं आठवतंय त्यानुसार, सीमा केळकर आणि अविनाश खर्शीकर होते. आणखी एक नायक त्यात होता,
प्रदीप पटवर्धन की प्रशांत दामले की आणखीनच कुणीतरी, ते आठवत नाहीये.
दोघे नायक होते इतके मात्र नक्की आठवतंय. कारण त्यातल्या एका भागात, त्या दोघांनी मिळून "सीमा"चं खोटं
अपहरण केलेलं दाखवलंय. ते तिघं मिळून तसा फोनही तिच्या "बापाला" करतात.
तुम्हापैकी कुणाला काही आठवतंय का काही?

....................... कृ. द. जोशी