मनाचा प्रोजेक्टर चालू बंद करणे हा मनोव्यापार असून तो आपण म्हणता त्या 'मी' ने तो करणे संभवत नाही. तसे प्रतिपादन करणे दिशाभूल करणारे ठरेल इतकेच माझे म्हणणे आहे. माझे असे एवढेच मत मी मांडलेले आहे. त्या जोडीला अध्यात्म/ अद्वैत तत्त्वज्ञान या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींच्या काही वचनांचा अनुवाद 'शेअर' करण्याचा आनंद मी लुटला इतकेच.
लेखाच्या सुरूवातीलाच 'तुमचे प्रतिसाद पुढील दिशा ठरवतील' असे लिहीलेले आहे . त्यातून तुम्हाला बंधन जाणवते आहे, ते असह्य होते आहे आणि त्यातून कसे मुक्त व्हावे यासाठी माझे मार्गदर्शन घेणे तुम्हाला मान्य आहे या परिघातच प्रतिसाद द्यावे तुमची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यामुळे चार शब्द लिहीले. असो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.