१. झोपी गेलेला जागा झाला - आत्माराम भेंडें, बबन प्रभू आणि इतरांचाही मस्त मजेदार अभिनय!

२. फूल खिले है गुलशन गुलशन - तबस्सुम यांचे लाजवाब सूत्रसंचालन.

३. किलबिल - मीना नाईकांचा लहान मुलांसाठी छान छान कार्यक्रम

४. सुंदर माझे घर - संचालिकांचे नाव आठवत नाही ... कोणी सांगावे आठवून.

५. अमृत मंथन - सुहसिनी मुळगावकरांचा खोल अभ्यासपूर्ण कार्यक्रम.

६. गजरा - बहुतेक सगळे भाग छान पण लक्ष्मीकांत बेर्डेंचा 'पाणी टंचाई' भाग , आणि त्यात लक्ष्याचा आंघोळीचा भाग खूप मजेदार होता

७. श्वेतांबरा - मोहन गोखले आणि इतर... एक छान गूढ मालिका होती ही, काहीही बीभत्सपणा नव्हता तरी पाहावीशी वाटत असे!

८. एक शून्य शून्य - शिवाजी साटमांचा इन्स्पेक्टर अदाकारीचा उदयकाळ!

९.  ये जो है जिंदगी - शफी इनामदार, स्वरूप संपत, राकेश बेदी, सतीश शाह ...

आणि किती तरी छान छान मालिका होत्या :-)

१०. जगावेगळी माणसे (? ) असा एक छान कार्यक्रम पण असे (?)

नुसता विचार केला तरी किती ताजे तवाने वाटते!