मी शब्द सुचलेल्या बाकीच्या सदस्यांपैकी एक असल्याने उत्तर देत आहे.
आपण कोडे शांतपणे वाचल्यास तुमच्या लक्षात दोन गोष्टी येतील
पहिली ही की शोधसूत्र म्हणजे अर्थ नव्हे. ते शब्द शोधण्याचे सूत्र आहे, थेट शब्दार्थ नव्हे. त्यामुळे अनन्यभाव याचा अर्थ लबाडीचा अभाव असा नसून लबाडीचा अभाव हे सूत्र वापरल्यास अनन्यभाव हा शब्द सापडू शकतो.
दुसरी गोष्ट ही की महेश यांनी दिलेला खालील दुवा पाहिल्यास अनन्यभाव या शब्दाचा अर्थ लबाडी किंवा दुजाभाव या शब्दांच्या विरुद्ध आहे. त्यावरुन हा शब्द सुचणे सहज शक्य आहे.
दुवा क्र. १