दर गुरुवारी नाटक असे.  चित्रीकरण बहुधा  मुंबई दूरदर्शन केंद्रात असे आणि ठरावीक पध्दतीने कॅमेरा फिरे.  कदाचित् एक किंवा दोनच कॅमेरांनी चित्रीकरण करण्याची पध्दत होती. नाटकात बाह्य चित्रीकरण जवळजवळ नसायचे. 
   मंगळवारी  मराठी  चित्रगीत, बुधवारी नव्या हिंदी गाण्यांचा चित्रहार आणि शुक्रवारी जुन्या हिंदी गाण्यांचे छायागीत असे.
   कथासागर मालिका, बुनियाद, स्पायडरमॅन, दादा दादीकी कहानियाँ, विक्रम बेताल, ही मॅन अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स, बाबाजी का बाईस्कोप, कच्ची धूप, भीम भवानी, एक दो तीनचार, जंतर मंतर या मालिका आठवतात.
   सुचिंनी दिलेली यादी चांगलीच आठवते. किलबिल सुरु होताना एकच पाटी दिसायची. शीर्षकगीतात विविध दृष्ये दाखविण्याची पध्दत नव्हती. लक्ष्मीकांत बेर्डे व नयनतारा यांचा भाग आठवतो. वारंवार दहावीला अनुत्तीर्ण होणारा पण स्वभावाने चांगला मुलगा लक्ष्याने मस्त उभा केलेला होता. श्वेतांबरामध्ये झाडाआडून पांढरा पदर सतत दिसायचा आणि तेच दृष्य मालिकेला परमोच्च गूढत्व प्रदान करून गेले होते.   मि. योगीतील मोहन गोखले आणि मोहक चन्ना रुपारेल आठवतात.