खरंच,
कसं असतं बघा. जुनं नुसतं आठवलं जरी, तरी किती छान वाटतं. कारण आपण नुसतंच "ते" जुनं आठवत नसतो, त्याबरोबरच बऱ्याच
गोष्टी स्मृतीत तरळून जातात.
प्रतिभा आणि प्रतिमा,
ज्ञानदीप, संतवाणी, आजचे पाहुणे............


मीसुची----अत्यंत आभारी आहे.
झोपी गेलेला जागा झाला ही मालिका आठवल्याबद्दल.
बाय द वे,
त्यात आत्माराम भेंडे, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, जया पानसे आणि आशा भेंडे (आत्माराम भेंडे यांच्या पत्नी)
इत्यादी लोक होते. मला हेही आठवतंय की आत्माराम भेंड्यांनी यात डॉ. आठवल्यांची भूमिका केली होती.

आणि एक शून्य शून्य.......मालिकाही भारी आणि तिचं शीर्षकसंगीतही.
पहिल्या भागाचं नाव----???? प्रेत कधी खोट बोलत नाही.
हे काय , आता सगळ्यांनाच माहिती असेल की यात शिवाजी साटम, दीपक शिर्के आणि अजय फणसेकर (अजय फणसे नव्हे) हे कलाकार होते.
आणि मला वाटतं, पहिल्या एपिसोडमध्ये गुन्हेगार "अनंत जोग" होते.!?!?!?!
असो.
बरं, सह्याद्रीवरील वृत्तनिवेद/दिकांची नावे आठवतात का?
माझ्याकडची यादी येणेप्रमाणेः
अनंत भावे, अजित दांडेकर, चारूशीला पटवर्धन, स्मिता तळवलकर, सायली गोविलकर, शोभा तुंगारे, अमृता राव, राजश्री-शेळके-टेंबे
अंजली पाठारे, स्मिता गवाणकर, अंजली मराठे, स्वाती सुब्रह्मण्यम
(यात कदाचित काही नावं ही निवेदिकांचीही असतील. म्हणजे, कार्यक्रमाची रूपरेषा सांगणारी. )
..........  चालू द्या. छान वाटतंय..........

कृष्णकुमार द. जोशी