माझे मत , नाटकात प्रसंग कमी वर्णनपर प्रसंग जास्ती असे वाटते. काहीही असले तरी म. रे. ची लोकल पाहून प्रेक्षक हरखून जातो हे नक्की.
आमचे लोकलशी भावनिक संबंध आहेत. नाटकातील अभाव प्रभावी नेपथ्य मारून नेते असे वाटते . प्रेक्षक त्यात गुंतून पडतात. त्यामुळे त्यांना
कथानकाविषयीचे प्रश्न कमी पडतात. मलाही कमी पडले. आत्ता लिहितो आहे ते नाटक बघून झाल्यावर. कलाकार प्रसिद्ध असल्याने नाटक
आकर्षित करते. (मी अमोल कोल्हे आणि आदिती यांचे नाटक पाहिले आहे). आपण म्हणता असा शेवट कदाचित मॅचिंग ठरला असता. पण
शेवट मला ठीक वाटला. तसेच आपण म्हणता त्याप्रमाणे गुरुजींना भावे हे लेबल लावले आहे , तेही बरोबर आहे. पण गुरुजी म्हंटले की
अजूनही आपल्याकडे , भावे, आपटे, रानडे हीच मंडळी डोळ्यासमोर येतात त्याला काय करणार ?