नेहमीप्रमाणे चित्रदर्शी लेखन. वरच्या दोन प्रतिक्रिया चिकटवून त्यांच्याशी सहमती दर्शवितो.
मला पावसाळा विशेष आवडत नाही पण लेखातील वर्णन मात्र वाचायला फार आवडले!
सुंदर लेख. मात्र चटकन उरकल्यासारखा वाटला.

'वाईवरून कोल्हापूर'
हे रोचक आहे. देशावर 'वाईवरून सातारा' असे म्हणतात
'स्पिरिट इज विलिंग बट फ्लेश इज वीक'
विदेशात एका सुपरमार्केटमध्ये फिरत असताना तिथले उसळते तारुण्य आणि लावण्य बघून माझ्या मित्राला मी  'स्पिरिट इज विलिंग बट फ्लेश इज वीक' असे म्हणालो. त्यावर तो चटकन 'लुक्स आर किलिंग बट प्रॉमिसेस आर ब्लीक' असे उत्तरला होता ते आठवले!
गाडी चालवताना संगीत ऐकणे हा संगीताचा आणि ड्रायव्हिंगचा अपमान आहे असे मी मानतो. व्यसनांची सरमिसळ वाईट.
जबरस्त असहमती. स्कॉचचे दोन पेग झाल्यानंतर जो एक मार्लब्रो ऍडव्हान्स पेटवत नाही त्याने दोन्ही व्यसने करू नयेत. रिकाम्या रस्त्यावर 'केतकी गुलाब जूही' ऐकावे. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर 'ठुमक ठुमक' ऐकावे. भल्या पहाटे गाडी काढून बाहेर पडल्यावर 'ऐ गमे दिल क्या करुं' ऐकावे (बरोबर ना, मीराताई? ), जबरस्त ट्राफिकमध्ये अडकल्यावर काचा वर करून 'ये परबतोंके दायरे' ऐकावे, खडबडीत रस्त्यावर 'घायाळ मी हरिणी' ऐकावे ....