रसभंगाचा धोका/आरोप पत्करूनही थोडे विषयांतर करण्याचा मोह आवरता येत नाही.
सत्तरच्या दशकाच्या मध्यातील गोष्ट आहे. संगणक भारतात तसा नवीनच होता. संगणकाविषयीचे घडवलेले/ घडलेले  विनोद तेव्हा फार प्रचलित होते. असाच एक घडलेला विनोद. एकाने इंग्रजीचे रशियनमध्ये आणि रशियनचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी  आज्ञावली  लिहिली.  त्या आज्ञावलीला स्पिरिट इज विलिंग बट फ्लेश इज वीक. हे वाक्य रशियनमध्ये भाषांतरित करायला सांगितले आणि त्या रशियन वाक्याचे पुन्हा इंग्रजीत भाषांतर करायला सांगितले. ह्या दोन्ही प्रक्रिया झाल्यानंतर जे वाक्य मिळाले ते असे.:  वाईन इज ऍग्रीएबल बट मीट हॅज गॉन बॅड.
संगणकाजवळ 'तारतम्य' हा गुण नसतो हे पटवून देण्यासाठी आम्ही हे उदाहरण नेहमी वापरत असू.